10 January, 2012

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०७

श्लोक १०७
शंखभृन्नन्दकी चक्री शारङ्ग्धन्वा गदाधरः 
रथाङ्गपाणीरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः  ।।
(९९) शङ्खभृत् :  - पांचजन्य नावाचा दिव्य शंख धारण करणारा. पांचजन्य शद्बाचा अर्थ होतो जो पाचापासून निर्माण झाला आहे (पांच ज्ञानेंद्रिये) तेच मन याअर्थी घ्यावयाचे, व मन हे अहंकाराचे अधिष्ठान आहे. आपल्या शास्त्राचे मतानुसार आपल्यामधील अहंकार तत्व आपल्यातील आत्मस्वरूप नारायणाचे हातातील शंख आहे.
(९९) नंदकी :  - भगवंताचे हातातील तलवारीचे नांव आहे नंदक. म्हणून या संज्ञेचा अर्थ होतो जो नंदक तलवार धारण करतो व ती चालवितो तो नंदकी. तसेच नंदक म्हणजे आनंद निर्माण करणारा. शास्त्रानुसार भगवंताच्या पवित्र हातातील दिव्य हे स्र म्हणजेच विद्या होय. ज्याच्यामुळे भक्त आपल्या अंतःकरणातील आत्मस्वरूपाचे अज्ञान नष्ट करतो.
(९९) चक्री :  - जो सुदर्शन नावाचे चक्र धारण करतो तो. सु-दर्शन म्हणजे जो दिव्य दृष्टि देतो तो. शास्त्राचे मतानुसार हे चक्र मनुष्याच्या मनाचे प्रतिक आहे.
(९९) शारङ्ग्धन्वा :  - जो आपल्या शारंग नावाच्या अमोघ धनुष्याने अचूक लक्षभेद करतो तो. आपल्या शास्त्रानुसार श्रीनारायणाचे हे धनुष्य अहंकाराचे प्रतिक मानले आहे. व अहंकार तत्व हे सर्व ज्ञानेंद्रियांचे शिखर आहे. या शेवटच्या श्लोकामध्ये श्रीनारायणाच्या हातातील सर्व आशिर्वादात्मक साधनांचे भक्ती व आदरानें स्मरण केले आहे.
(९९) गदाधरः :  - ज्याने हातामध्ये कौमोदकी नावाची सुप्रसिद्ध दा धारण केली आहे तो गदाधर. ही गदा आनंद व सौंदर्य पसरविते. गदा मनुष्यातील बुद्धितत्वाचे प्रतीक आहे.
(९९) रथांगपाणीः :  - परंपरागत अर्थ आहे ज्याने रथाचे चाक हातामध्ये शस्त्राप्रमाणे धारण केले आहे तो. म्हणजेच या श्लोकामध्ये वर्णन केलेले चक्र. व तो चक्री होय. परंतु इतर कांही जण या संज्ञेचे दुसरेही विवेचन करतात. परंतु भक्तीकाव्यामध्ये पुनरूक्ती हा काही दोष होत नाही व ते अगदी नैसर्गिकच आहे.
(९९) अक्षोभ्यः :  - निंदाव्यंजक शद्बांनी किती निंदा केली अगर कुणीही कुठलेही अपमानकारक कृत्य कितीही वेळां केले तरी जो क्षुब्ध होत नाही असा. बाह्य जगतातील कुठल्याही घटनेने ज्याची अंतरीक शांनी व निरवता कधीच ढवळली जात नाही तो नित्यशांत अक्षोभ्य होय. या संज्ञेने भगवंताची अपार क्षमाशीलता चे मनुष्यावरील अगाध प्रेम, करुणा व दया सुचविली आहे.
(१०००) सर्वप्रहरणारयुधः :  - ज्याला युद्ध करण्याकरतां व प्रहार करण्याकरतां सर्व आयुधांची, शस्त्रांची उपलब्धता आहे असा. कुठलाही शत्रु त्याला आश्चर्यचकित करूं शकत नाही, म्हणून तो सर्व विजयी आहे. त्याचे जवळ कुठल्याही बलाढ्य शस्त्राला प्रतिकार करू शकेल असे समर्थ स्र उपलब्ध आहे म्हणून तोच नेहमी विजयी ठरतो.
'' श्री सर्वप्रहरणायुधः नमः इति''
श्रीकृष्णाय परब्रह्मणे नमः

डॉ. सौ. उषा गुणे.

1 comment:

विक्रम वालावलकर. said...

खूप परिश्रमाने हे काम केलेले आहे. आम्हासारख्यांना ह्या अर्थांचा खूप उपयोग होईल.
धन्यवाद.

विक्रम नरेंद्र वालावलकर, दादर.