05 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ७५


लोक ७५
द्‌गतिः सत्कृतिः सत्ता द्‌भूतिः सत्परायणः 
शूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयामुनः  ।।
(६९) सद्गतिः :  - सत्प्रवृत्त व उदार मनुष्यांचे ध्येयरूप असा. श्रीनारायण हेच साधकांचे आध्यात्मिक ध्येय [1]असते. या ठिकाणी सत्‌प्रवृत्त म्हणजे ज्यांना ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान असते असे लोक कारण उपनिषदे म्हणतात ' जो मनुष्य ब्रह्म आहे असे जाणतो त्याला विद्वान लोक 'संत' म्हणतात.
(७००) सत्कृतिः :  - ज्याचे आचरण अत्यंत चांगले आहे असा. श्री हरी उत्पत्ति स्थितीचे योग्य प्रकारे प्रवर्तन करतो व त्याच्या संवर्धनाचे तत्वज्ञानही जाणतो. जरी कांही वेळां त्याला संहारक कृत्य करावे लागले तरी त्यातून व्यक्ती करतां अगर जगताकरता चांगल्याचीच निर्मिती करावयाची असते. त्याची सर्व कृत्ये ही परमशांतीची स्थापना करण्याकरतांच असतात.
(७०) सत्ता :  - ज्याला दुसरा (द्वितीय) कोणी नाही असा परमात्मा अद्वितीय आहे. त्यामुळे तो नित्य असून [2]त्यामध्ये सजातीय-विजातीय भेद नाहीत.
(७०) सद्‌भूतिः :  - ज्याचे वैभव श्रेष्ठ आहे असा. या ठिकाणी 'भूति' म्हणजे वैभव, सामर्थ्य व ऐश्वर्य. त्याने अनेक अवतार धारण केले व त्यामध्ये परमात्म्याच्या विभूतिंचे ऐश्वर्य प्रकट केले. परमात्म्याच्या विभूति अनंत आहेत तरीही त्यासर्व मिळून त्याचे दिव्य सामर्थ्य पूर्णपणे प्रकट करूं शकणार नाहीत. देवही ते जाणू शकत नाहीत. फक्त योगी लोक ध्यानावस्थेमध्ये त्याच्या अनंत विभूतिंची थोडीशी प्रचीति घेवूं शकतात.
(७०) सत्परायणः :  - जे सत्याची उपासना करतात अशा सत् जनांचे ध्येय. अर्थात येथे सज्जन म्हणजे ब्रह्मज्ञानी असाच घ्यावयास पाहिजे.
(७०) शूरसेनः :  - पराक्रमी व शूर योद्धयांची सेना असणारा. या संज्ञेने श्रीराम व श्रीकृष्ण यांचा निर्देश केला आहे कारण त्यांच्या सेनेमध्ये महाबली हनुमान, लक्ष्मण, अर्जुन, भीम यांचा समावेश आहे.
(७०) यदुश्रेष्ठः : यदुवंशांत सर्वश्रेष्ठ. यादवांमध्ये सर्वश्रेष्ठ असे श्रीकृष्ण श्रीनारायणाचाच अवतार व विभूति होते.
(७०) सन्निवासः :  - सत् जनांचे निवासस्थान. परमज्ञानी भक्त त्या परमात्म्यामध्येच निवास करतात, भगवत भावामध्येच पूर्ण निमग्न झालेले असतात व आपल्या त्या स्थानातूनच आपल्याभोवती दिव्यज्ञानाचा प्रकाश पसरवितात. [3] गीतेमध्ये भगवंत म्हणतात, 'माझे भक्त सर्वांतर्यामी वसत असलेले ते सत्य (ज्ञेय) जाणतात व माझ्या ठिकाणीच सतत वास करतात.
(७०) सुयामुनः :  - यमुनेच्या तीरावर रहाणारे ते 'यामुन' म्हणजेच गोप व त्याच्यामधील जे सज्जन होते त्यांच्याडून जो पूजिला[4] जातो तो सुयामुन. अध्यात्मिक दृष्ट्या हे केवळ गाई राखणारे गोप नाहीत तर ज्ञानरूपी दुग्धामृताचे सेवन करणारे साधक होत.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]    अस्तिब्रह्मोतिचेद्वेद सन्तमेन ततो विदुः । तैतिरिय २-६
[2]   एकमेवाद्वितीयम् - छांदोग्य ६-२१ - सजातीय विजातीय स्वगत भेद रहित वस्तुः ।
[3]   मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावोपपद्यते  ।
[4]   तारूण्यारम्य रम्यं परमसुखरसास्वाद रोमांचितांगैः । आवीतंनारदाद्यौर्विलसदुपनिषत्सुंदरी मंडलैश्च ।  (नारायणीय देशक१००.१) – नवतारुण्याच्या रमणीयतेने नटलेला, मनोहारी, ज्यांची अंगे आनंदाच्या रसास्वादसुखाने रोमांचित झालेली आहेत अशा नारदादि भक्तांनी परिवेष्टित असा, व दिव्य उपनिषद् सुंदरींच्या मंडलांनी वेढलेला अशा सर्वांगसुंदरास मी पाहतो.

No comments: