25 December, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०२

श्लोक १०२
आधारनिलयोऽधाता पु्ष्पहासः प्रजागरः 
ऊर्ध्वगः सत्पथाचारः  प्राणदः प्रणवः पणः  ।।
(९५०) आधारनिलयः :  - जो मूलभूत आधार आहे असा. सर्व अस्तित्वाचा आधार. सर्व सजीवनिर्जीवास आधार आहे पृथ्वी व ही पृथ्वी त्या परमातम्याच्या आधाराने रहाते. व्यक्तिमध्ये अंतरात्म्याच्या आधारावरच मन आपले नामरूपात्मक जग उभारते.
(९५) अधाता :  - ज्याचेवर कोणी आज्ञाकारी अगर शासक नाही असा. कारण तोच सर्व श्रेष्ठ शासक आहे. तोच विधीही आहे. विधी व विधाता एकरूपच आहेत हे त्यातील चिरंतन सत्य आहे.
(९५) पुष्पहासः :  - जो उमलणार्‍या पुष्पांप्रमाणे प्रकाशित होतो असा. कळी उमलते व त्यातून पुष्प प्रकट होते परंतु पुष्प कळीमध्ये आधीही अप्रकट अवस्थेत असतेच. स्वतः परमात्मा महाप्रलयाचेवेळी अव्यक्त अवस्थेमध्ये असतो व वासनांची परिपूर्ती करण्याकरतां पुन्हा नामरूपजगताच्या रूपानें विकसित होतो म्हणून त्यास पुष्पहास अशी संज्ञा दिली आहे.
(९५) प्रजागरः :  - नित्य जागृत. ज्याला कधीच निद्रा येत नाही असा.निद्रा म्हणजे अज्ञान. सत्याबद्दलचे अज्ञान म्हणजेच अविद्या व या अविद्येमुळेच मी व माझे हे विपरीत ज्ञान निर्माण होते व त्यातूनच दुःख व संकटे निर्माण होतात. श्री नारायण स्वतः आत्माच असल्याने सतत जागृत असतो व आपल्या अनंत दिव्य स्वरूपांत भक्तांकरतां नित्य प्राप्त होवूं शकतो.
(९५) ऊर्ध्वगः जो नेहमी सर्वांचे वर शिखरावर स्थित असतो किवा जो नेहमी उर्ध्वदिशेने जातो तो. तो परमोच्च सत्य आहे व उत्क्रांतीचे शिखर आहे. जो सतत उत्तरोत्तर उर्ध्वदिशेने जातो तो ’ऊर्ध्वगः’. [1]
(९५) सत्पथाचारः :  - जो नेहमी सत्य मार्गाने चालतो तो. जो मार्ग आक्रमिला असतां सत्याची प्राप्ती होते तो [2]सत्पथ. तो निष्ठेने आचरण करणार्‍यांचेच इतरेजन अनुकरण करत असतात अशी भगवंत गीतेमध्ये सूचना देतात. भगवंत स्वतः पूर्णतेचे प्रतीक आहे भक्त त्यास आदर्श ठेन आपल्या आयुष्यात भगवंताचे निरपेक्ष प्रेम, चांगुलपणा व पूर्ण शांतीचे अनुकरण करण्याचा प्रयत्‍न करतात.
(९५) प्राणदः :  - जो सर्वांना प्राणदान करतो तो. आपल्या शास्त्राप्रमाणे प्राण म्हणजे जीवनाची व्यक्त दशा दर्शविणार्‍या शारीरिक क्रिया व घडामोडी होत. आपली सर्व इंद्रिये, मन बुद्धि हे त्या आत्मस्वरूप नारायणाकडूनच शक्ति मिळवितात व त्यामुळेच शारीरिक संवेदना, मानसिक संस्कार व बुद्धिने ज्ञान मिळविण्याची क्रिया करूं शकतात. म्हणूनच त्याला 'प्राणद' म्हटले आहे
(९५) प्रणवः :  - प्रणव म्हणजे कार. वेदामध्ये पूर्णसत्य हे काराने दर्शविले जाते. परमसत्य प्रकट करणारा ध्वनी म्हणजेच कार. श्री नारायणास प्रणव म्हटलेले आहे कारण नारायणचे स्वरूपच कार आहे.[3]

(९५
) पणः :  - सर्व विश्वाचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. पण ह्या धातूचा अर्थ होतो व्यवहार करणे तो सर्व कर्माचे योग्य बक्षिस देतो. प्रत्येक व्यक्तिला योग्य ते आदेश देतो. व त्याचेकडून योग्य ते कर्म करवितो. मानव व सुनिश्चत नियमांनी बद्ध झालेले विश्व यांच्यामधील क्रियांचे व्यवस्थापन व अधिक्षणही तोच करतो.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   ऊर्ध्वं गच्छति इति ऊर्ध्वगः ।
[2]      यद्यदाचति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन !
[3]       कार स्वरूपो हि नारायणः ।
  

No comments: